सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जनता दरबार - तक्रार निवारण दिन संपन्न अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेला नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेला नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर 10 ( प्रतिनिधी गौरीशंकर कांबळे )
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण घटकांतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याकरता सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे जनता दरबार आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी समोरासमोर ऐकून घेतल्या सोबतच नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राहुल आत्रम (भापोसे ) परिक्षाधीन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी हे उपस्थित होते . नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन ती तक्रार जागीच मिटवण्याकरिता संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. जनता दरबारात ग्रामीण भागातील महिलांच्या विषयी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी भरोसा सेलच्या महिला देखील उपस्थित होत्या . महिलांच्या कौटुंबिक तक्रारीचे निराकरण करण्याकरता सुमारे ६५ नागरिक उपस्थित होते. जनता दरबार तक्रार निवारण दिना दरम्यान सुमारे ११५ नागरिकांनी आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडल्या. सर्वांच्या तक्रारीचे समाधान झाल्याचे सांगण्यात आले. ज्यांच्या तक्रारीची दखल घ्यायची आहे अशा तक्रारदाराची तक्रार संबंधित पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले . तसेच जवळपास १४३ तक्रारी अर्जावरती कारवाई करून निर्गती केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांच्या तक्रारी निवारणकरिता विधी सेवेचे एडवोकेट शिवकैलास झुरळे उपमुख्य लोकअभीरक्षक विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांनाही याप्रसंगी नागरिकांना त्यांच्या तक्रारी बद्दल योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन मिळण्याकरीता निमंत्रित केले होते. सुमारे एक वर्षापासून विभक्त झालेल्या महिला तिच्या माहेर आणि सासरच्या कुटुंबियांसमवेत समुपदेशन करून महिलांना सासरी नांदण्यास पाठवून दिले, यावेळी महिलेच्या आणि सासरच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. सदरचा जनता दरबार व तक्रार निवारण दिन पार पाडण्याकरता पोलीस उप निरीक्षक उस्मान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण, महिला पोलीस नाईक ज्योती कोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा करणे, पोलीस नाईक गवंडी, पोलीस कॉन्स्टेबल कोरले, पोलीस कॉन्स्टेबल विश्वकर्मा यांनी आलेल्या सर्व तक्रारदारांच्या तक्रार ऐकून तक्रारीच्या स्वरूपानुसार तात्काळ कारवाई करणे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडे पाठवून ते पाठपुरावा केला व तक्रारदारांची निरसन केले. यावेळी महिला शाखा भरोसा सेलचे पोलिस उप निरीक्षक सुरेखा शिंदे, एएसआय कवचाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भोगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल मस्के, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांचे पथक हजर होते.







