Nation

कंदलगाव येथे विशेष ग्रामसभा संपन्न;

मतदार पुनर्निरीक्षण यादीचे वाचन

कंदलगाव, दक्षिण सोलापूर, दि. 2 ऑगस्ट (प्रतिनिधी राहुल उडाणशिव): भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत कंदलगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व बीएलओ (BLO) यांनी मतदार यादीचे सविस्तर वाचन करून मयत, स्थलांतरित, दुबार नोंद असलेले तसेच पडताळणीदरम्यान न आढळून आलेल्या मतदारांची माहिती ग्रामस्थांसमोर मांडली.मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक राहावी, या उद्देशाने ग्रामस्थांकडून आवश्यक सूचना व हरकतीही नोंदवून घेण्यात आल्या. तसेच पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सर्व बी.ए.ल.ओ. तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button