वांगी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन


सोलापूर, दि. ३१ जुलै ( द लोकतंत्र न्यूज नेशन नेटवर्क )
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन आज वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर शहर युवक महासचिव धर्मराज उर्फ अमर डुरके, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पा गायकवाड, तालुकाध्यक्षा लक्ष्मी सोनकांबळे, तालुका महासचिव संगीता पुजारी, माजी तालुका द. महासचिव श्रीकृष्ण रणदिवे, माजी युवक तालुका अध्यक्ष विकास सोनवणे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता राजगुरू या होत्या.
यावेळी वांगी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
वांगी शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
1. शाखाप्रमुख : सौ. सुज्ञानी सोनवणे ( *ग्रामपंचायत सदस्य )*
2. अध्यक्षा : सौ. प्रणिती दावणे
3. उपाध्यक्षा : सौ. वनिता सोनवणे
4. महासचिव : सौ. मंगल सोनवणे
5. सचिव : सौ. कविता सोनवणे
6. संघटक : सौ. रेणुका संजय बनसोड, सौ. सुवर्णा हेग्ने, सौ. नागुबाई सोनवणे
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा श्वेता राजगुरू म्हणाल्या, _”डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालून महिलांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक घरात संविधान, शिक्षण आणि स्वाभिमानाचा विचार पोहोचवण्यासाठी महिला आघाडी पुढाकार घेईल.”_
जिल्हा उपाध्यक्षा सौ. पुष्पाताई गायकवाड आणि तालुकाध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई सोनकांबळे यांनी महिलांना संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला सदस्य आणि पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.




