दि ०४ ऑगस्ट, भीमा नगर उजनी धरण अपडेट


सोलापूर , दि ४ ऑगस्ट , ( जिमाका )
🚨🚨 महत्त्वाची सूचना🚨🚨
उजनी धरण
दिनांक :- 04 ऑगस्ट 2026
सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढलेने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक- 04.08.2026 रात्री 10:00 वाजता 110000 क्यूसेक्स एवढा विसर्ग करण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
सु. उ. डुंबरे
कार्यकारी अभियंता,
उजनी धरण व्यवस्थापन विभाग,
भीमानगर



