तुळजापुरातील भीम नगर,सिद्धार्थ नगर आणि मातंग नगरसाठी ब्लू प्रिंट तयार करणार-नगराध्यक्ष विनोद गंगणे


तुळजापूर दि. ११ ( प्रतिनिधी सूरज थोरात )
तुळजापूर शहरातील भिमनगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे तसेच प्रभाग क्र 6 च्या नूतन नगरसेवीका सरोजा अमृतराव, सागर कदम, शहरातील नगरसेवक औंदूबर कदम, सुनील रोचकरी, किशोर साठे, रामचंद्र रोचकरी, दिनेश क्षिरसागर, मनोज गवळी आदींसह भाजपा तालुका अध्यक्ष आनंद कंदले,शांताराम पेंदे,राम चोपदार, रिपाई नेते तानाजी कदम, प्रकाश कदम, अरुण कदम, दयानंद कदम, राजरत्न कदम,हीरा सोनवणे,अंकुश माने, माजी नगराध्यक्ष मा. संगीता कदम, नंदकुमार कदम, बंडू कांबळे आदींची प्रमुख उपस्थीत होती.
प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून नूतन नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी भीमनगर,सिद्धार्थनगर आणि मातंगनगर साठी ब्लू प्रिंट तयार करून या भागात येणाऱ्या काळात विविध विकास होणार असल्याचे सांगीतले.
यावेळी संघर्ष प्रतिष्ठान गृप चे कीरण कदम, अक्षय कदम, चेतन कदम, कमलेश कदम दिपक सोनवणे,ओमकार भालेकर, अनूज कदम, दादा सरकार कदम, नागेश कदम,विनोद भालेकर, गोकुळ कदम,नागेश कदम,शुभम बल्ली कदम राहुल सोनवणे, सुधीर सोनवणे, आदित्य कदम, रत्नदीप कदम,समर्थ कदम, हर्षदीप सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.







