YO BYKES EV शोरूमचे दिमाखदार उद्घाटन

जनसेवक महादेव कोगनुरे यांचे आता Yo bykes व्यवसायातही पदार्पण

सोलापूर, दि. ४ ऑगस्ट : (द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क)
पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जनसेवक श्री. महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी सोलापूरचे माजी खासदार तथा मार्गदर्शक डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत या नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास श्री. महादेव कोगनुरे, त्यांचे सहपरिवार, नातेवाईक, सागर सिमेंटचे अधिकारी, अतिथी प्युअर व्हेजचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर कमी खर्च, अत्यल्प देखभाल आणि प्रदूषणमुक्त प्रवासामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर YO BYKES ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसचे सर्वेसर्वा श्री. महादेव कोगनुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “या नव्या व्यवसायात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमासाठी मला विश्वासाने संधी दिल्याबद्दल कंपनीचे तसेच विशेषतः सिमेंट क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक आणि YO BYKESचे सोलापूर जिल्हा वितरक श्री. बाळासाहेब मुंदडा यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.”
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी नव्या शोरूमला शुभेच्छा देत. लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या या नव्या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या…




