प्रभाग क्र.०६ मधून यासीन शेख यांचा काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागणी अर्ज सादर


सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र ०६ येथून खुल्या प्रवर्गात /नागरिकाचा इतर मागास प्रवर्ग काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवार यासीन बशीर शेख यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन, सोलापूर येथे सुपूर्द केला.
याप्रसंगी माजी महापौर श्री. अरिफ शेख, माजी आमदार श्री. विश्व् नाथ चाकोते,माजी महापौर संजय हेमगड्डी, जेष्ठ नेते अशोक निंबर्गीसर, युवा नेते सागर शहा, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यासीन शेख मित्र परिवार, संदीप चौरे, प्रमोद बॉस गायकवाड, अजरोद्दीन शेख, इबाद काझी,महिबूब नदाफ, रणजित महामुनी, संगप्पा कांबळे, रोहित परदेशी, विपीन बनसोडे, सोहेल शेख आदि मान्यवरांसह अर्ज दाखल करण्यात आला.
अर्ज सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना यासीन शेख यांनी म्हणाले, प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास, दिलेला पाठिंबा तसेच गेल्या अनेक वर्षांत केलेले सामाजिक कार्याची तसेच पक्षातील असलेल्या सक्रिय सहभागाची आणि कामाची पक्षकार्य याची दखल पक्षनेतृत्व निश्चितच घेईल. माजी केंद्रीय गृहमंत्री लोकनेते श्री. सुशीलकुमार शिंदे, खासदार कु. प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठी आपल्या उमेदवारीचा सकारात्मक विचार करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी व बंद लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे, त्यांच्या न्याय हक्का साठी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अंध, अपंग दिव्यांग यांना मदत,शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेला जनतेच्या अडचणीचे जान असलेला निष्कलंक युवा चेहरा म्हणून यासीन शेख यांच्याकडे पाहिले जात आहे . ते सातत्याने आवाज सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत आले आहेत . भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही यासीन शेख यांनी स्पष्ट केले. यासीन शेख यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्कीच याचा पक्षाला फायदा होईल यानी पक्ष बळकटीकरणासाठी निश्चित फरक पडेल असा विश्वास जनतेमधून पाहावयास मिळाल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे . पक्षश्रेष्टी उद्या काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



