Nation
Trending

सरपंच यशपाल वाडकर ' राज्यस्तरीय आदर्श सरपंच ' पुरस्काराने सन्मानित

सोलापूर दि . ८ (प्रतिनिधी यासीन शेख ) : महाराष्ट्रातील ग्रामविकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकनियुक्त सरपंचांचा गौरव करण्यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान सोहळा २०२५ मध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अहिल्यानगर सावेडी रस्त्यावरील माऊली संकुल सभागृहात आयोजित हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज (प्रमुख महंत, महाकाल मंदिर, उज्जैन) यांच्या हस्ते सरपंच यशपाल वाडकर यांना ‘आदर्श सरपंच’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामविकासासाठी केलेली भरीव कामगिरी, लोकसहभागातून राबवलेले विकास उपक्रम, लोकाभिमुख प्रशासन तसेच सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन हा राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार देण्यात येतो.

स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेब पावसे व यादवराव पावसे यांनी संयोजक म्हणून मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमास डॉ. सुधा कांकरिया, डॉ. शंकर अंदानी, रुचिरा देसाई यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील सरपंच तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना सरपंच यशपाल वाडकर यांनी हा सन्मान ग्रामस्थ, सहकारी सदस्य व कार्यकर्त्यांना समर्पित करत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढेही प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी शहाजहान शेख, नाना खारे, प्रकाश हेडे, संभाजी चौगुले, राम पाटोळे, शिवाजी मोटे, समाधान जाधव, केदार ढेकळे, मोहन जाधव, शिवदास वाडकर, जालिंदर गायकवाड, नारायण जाधव, सोनाली वाडकर, कल्पना राऊत यांसह कासेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button