Nation
Trending

बँक ऑफ इंडिया स्टाफ क्रेडिट को-ऑप सोसायटी लि. सोलापूर – नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

सोलापूर, दिनांक ६ (प्रतिनिधी रमेश जाधव) : बँक ऑफ इंडिया स्टाफ क्रेडिट को-ऑप सोसायटी लि. सोलापूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी मा. एल. एम. कांबळे, उपाध्यक्षपदी मा. डी. व्हि. बोडरे, सचिवपदी मा. एस. के. गुत्ते आणि खजिनदारपदी मा. आर. एस. ढेकळे यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सभासद व संबंधितांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संस्थेच्या विकासासाठी पारदर्शक व सदस्याभिमुख कारभाराला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री. गजानन वडेकर, जिल्हा सहाय्यक उपनिबंधक, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button