माँ साहेब कॅब संस्थेतर्फे सोलापुरातील निवडणूक यंत्रणेत वापरण्यात येणाऱ्या खाजगी गाड्यांवर कारवाईसाठी आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन

माँ साहेब कॅब संस्थेच्यावतीने पालिका आयुक्तांना निवेदन

सोलापूर दि ५ (प्रतिनिधी रणजीत महामुनी )
माँ साहेब कॅब संस्था सोलापूर टीमच्यावतीने सोलापुरातील निवडणूक यंत्रणेत वापरण्यात येणाऱ्या अवैध खाजगी गाड्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले.
सध्या सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू असून यामध्ये शासकीय कामात निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना खाजगी वापराची वाहने भाडेतत्वावर देण्यात आली असून ती पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले . आयुक्तांनी यावर लवकरच निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. कार्यवाही न झाल्यास संस्थेने आंदोलनाचा इशारा दिला आहे . यावेळी माँ साहेब कॅब संस्थेच्या प्रमुख वर्षाताई शिंदे यांनीही कार्यवाही न झाल्यास सोलापुरात येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी संस्थेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यासीन भाई शेख,सचिव रणजीत महामुनी,सल्लागार संगप्पा कांबळे,कार्याध्यक्ष प्रदीप कोळी यांच्यासह संस्थेचे सदस्य रोहित परदेशी,सुरेश माताडे,नितीन आडके, विक्रांत कोळी, सदानंद शिंदे,सैपन नदाफ, संकेत परदेशी, सिद्धू कुंभार,तुषार शिंदे,प्रशांत कदम, विरेश कंदगुळे , श्रीराम भोसले,बालाजी गिरबाने आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थितीत होते



