Nation

अक्षर जुनियर कॉलेज कंदलगावच्या खेळाडूस राष्ट्रीय सुवर्ण पदक

कंदलगाव, दक्षिण सोलापूर, दिनांक 8 ऑगस्ट, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) 13 व्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया तर्फे हरियाणा (रोहतक) येथे राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या. ह्या स्पर्धा 31 जुलै ते 02 ऑगस्ट 2026 दरम्यान पार पडल्या. अक्षर जुनियर कॉलेज कंदलगाव येथील खेळाडू समर्थ संजय चव्हाण ह्याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत असताना 45 वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजयी होत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच त्याची मलेशिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास कोच शिवराज मुंगळे ह्यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. शेजाळ, उपाध्यक्षा आकांक्षा शेजाळ (वाघ), सचिवा अपर्णा शेजाळ, मुख्याध्यापक अशोक कोळेकर, क्रीडाशिक्षक महासिद्ध वाले, रत्नदीप भोपळे, निखिल घोडके व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी सर्वांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button