संविधान दिनानिमित्त मंत्री जयकुमार गोरे व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न


धाराशीव दि २६ (प्रतिनिधी सुरज थोरात)
संविधान दिनानिमित्त धाराशीव येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारराव गोरे तसेच आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.या वेळी संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे स्मरण करून लोकशाहीची उज्ज्वल परंपरा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार कार्य करणे हीच खरी कृतज्ञता असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.कार्यक्रमाला दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन कांबळे, संताजी चाळुक्य, उद्धवबाबा पाटील, रामदास कोळणे, नितीन भोसले, युवराज नळे, नितीन शेरखाने तसेच धाराशीव नगरपरिषद निवडणुकीतील भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्नेहालता राहुल कांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाने दिलेला सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाहीची नीती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. संविधान दिनानिमित्त देशभक्ती व लोकशाही मूल्यांबद्दल निष्ठा जपत कार्यक्रम उत्साहात पार पडला.





