Nation

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्यावतीने सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांचा वाढदिवस साजरा

सोलापूर, दि १६ जुलै ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण), सोलापूरचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या प्रतिनिधींनी अधीक्षक अभियंता सुनील माने यांचा शाल परिधान करून, पुष्परोप भेट देत व शुभेच्छा व्यक्त करून सन्मान केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुष्पगुच्छाऐवजी वृक्षरोप भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी कौतुक करून समाधानही व्यक्त केले.

याप्रसंगी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगप्पा शालन गौतम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश माळशिकारे, डॉ. सिद्धार्थ तळभंडारे, Er. महेश गायकवाड, वेदिका ट्रॅव्हल्सचे प्रमुख राहुल शिंदे या प्रमुख मान्यवरांनी सुनील माने यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महावितरणच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे सुरू राहाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button