Nation

प्रहार संघटनेचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 दिव्यांगांच्या ५% निधीची तातडीने मागणी 

धाराशिव ( उस्मानाबाद ) दि १२ डिसेंबर ( प्रतिनिधी सूरज थोरात )  :  

दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून मिळणारा ५ टक्के निधी थेट व वेळेत देण्यात यावा, तसेच विविध प्रलंबित समस्यांचे निराकरण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे, ज्यात दिव्यांग विकास निधीचा योग्य वापर, जिल्हा नियोजन समितीत दिव्यांगांसाठी राखीव कोटा लागू करणे आणि इतर मागण्यांचा समावेश आहे.

  • जिल्हा नियोजन समितीमधील निधी  (TDC) दिव्यांगांसाठी काटेकोरपणे वापरली जावी.
  • दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा.
  • दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी एकत्रित लढा देणे. 

 आपल्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बसून घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

या वेळी आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने सहभागी झाले. दिव्यांगांच्या हक्कांबाबत लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शासनाने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.

“दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी योग्य पद्धतीने वितरित न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button