महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी मंच व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर संपन्न.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी मंच व सोलापूर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर संपन्न .
विधिमंचतर्फे रक्तदात्यांना लेखक जगदीश ओव्हाळ यांचे गाजलेले तसेच बेस्ट सेलर व नेल्सन मंडेला पुरस्कार प्राप्त पुस्तक “जग बदलणारा बापमाणूस” पुस्तक भेट.
सोलापूर दि. ६ डिसेंबर ( सोलापूर प्रतिनिधी )
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी मंच व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रमाने अभिवादन करण्यात आले . या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला . अनेक मान्यवरांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले . रक्तदान केलेल्या रक्तदात्यास प्रोत्साहनपर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच तर्फे लेखक जगदीश ओव्हाळ लिखित बेस्ट सेलर व नेल्सन मंडेला पुरस्कार प्राप्त पुस्तक “जग बदलणारा बापमाणूस” हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी विधी मंचचे अध्यक्ष ॲड. शताब्दीकुमार मधुकर दोड्यानुर, ज्येष्ठ वकील ॲड अजय रणशृंगारे, ॲड राजरत्न बनसोडे,ॲड. चंद्रसेन गायकवाड, सोलापूर बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. अरविंद देडे, विधिमंडचे सचिव ॲड. दीपक हुलसुरे, विधि मंचचे उपाध्यक्ष ॲड. विनीत गायकवाड,ॲड. अमर लंकेश्वर,ॲड. सत्यजित वाघमारे, ॲड.राजेश सिद्धगणे, ॲड. मलिक कांबळे,ॲड. योगीराज बिराजदार, ॲड. अक्षय सोनकांबळे, ॲड. नागसेन माने, ॲड. कुणाल भडकवाड, ॲड. रितेश कोन्हाळीकर या प्रमुख मान्यवरांसह बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच तसेच सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वकील बांधवांनी मेहनत घेतली.








