डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले.
सोलापूर, दि ६ डिसेंबर ( वृत्तसंकलन शांताराम वाघमारे निवृत्त PSI )आज दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर येथे शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बिगुल वाजवून, धीर–गंभीर वातावरणात सलामी देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर व महार बटालियनचे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या यशसिद्धी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष केला. त्यांचे विचार आचरणात आणणे, उच्च शिक्षण घेणे, एकजुटीने राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे — हीच खरी त्यांना दिलेली खरी आदरांजली असेल असे शाक्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगद मुके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.” शाक्य संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत गायकवाड, शेखर वाघमारे, अंगद मुके, गोपी कांबळे, अशोक सोनवणे, गौतम चंदनशिवे, किसन सूरवसे, अशोककुमार दिलपाक, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, शांताराम वाघमारे ,राजेंद्र ओहोळ, कैलास गायकवाड, मिलिंद कोरे,आनंद काळोखे,शशिकांत बाबरे,नागेश गायकवाड,चंद्रकांत कांबळे, सुधाकर सुरवसे, नाना गाडे, ईश्वर मसलखांब यांच्यासह यशसिद्धी संघटनेचे २५ माजी सैन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन शांताराम वाघमारे यांनी केले.




