
ग्राम महसूल अधिकारी अमोल मगर यांच्या तत्परतेचे कौतुक ; ४५०० हेक्टर क्षेत्रातील २७०० शेतकऱ्यांचे पंचनामे

कंदलगाव (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कंदलगावचे ग्राम महसूल अधिकारी अमोल मगर हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्याचे काम करत आहेत.कंदलगाव, गावडेवाडी व येळेगाव परिसरात सुमारे ४५०० सेक्टर क्षेत्र असून २७०० शेतकऱ्यांचे पंचनामे करावयाचे आहेत. या कामाचे नियोजन करताना आज कोणत्या भागात, उद्या कोणत्या भागात पंचनामे होणार तसेच पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर दिली जात आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सूचना देऊन जागरूक केले जात असल्याने पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून तत्परतेने काम आणि माहितीचा पारदर्शकपणे प्रसार केल्याबद्दल ग्राम महसूल अधिकारी अमोल मगर यांच्या कार्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.



