समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मराठी पत्रकार दिनी रेल्वे लाइन येथील लोकमंगल पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम

मराठी पत्रकार दिनी रेल्वे लाइन येथील लोकमंगल पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर दि. ६ जानेवारी ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोकमंगल पतसंस्था रेल्वे लाइन शाखेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार आणि संपादकांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले .पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्यामुळे समाजात पत्रकारांचे खूप महत्व असून पत्रकारांनीही आपल्या पत्रकारितेला न्याय देऊन कार्य करत राहावे अशी संस्थेच्यावतीने किशोर सलवदे यांनी भावना व्यक्त केली . यावेळी माजी मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सल्लागार कल्पना रेडेकर यांनी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचे विशेष कौतुक केले. त्या बोलताना म्हणाल्या की आज समाजात खूपच वाईट परिस्थिति निर्माण झाली आहे, आजची राजकीय स्थिती पाहता सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले तरीही पत्रकार सत्याची बाजू घेऊन आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत म्हणून त्यांनी पत्रकारांची काळजी आणि भीतीही व्यक्त केली. सत्कार प्रसंगी आलेल्या सर्व पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करून पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेचे किशोर सलवदे आणि त्यांच्या टीमने यावेळी मेहनत घेऊन कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाडला. पतसंस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आलेले संपादक तसेच पत्रकार –
1)श्री.सुदर्शन तेलंग – आज तक सोलापूर संपादक
2)श्री.संगप्पा कांबळे -लोकतंत्र डिजीटल न्यूज मराठी संपादक
3)श्री.रमाकांत साळुंखे – सिद्धेश्वर संदेश संपादक
4)श्री.सोमनाथ गायकवाड – दैनिक लोकवार्ता उपसंपादक
5)श्री.शिवाजी सावंत – आम्ही सोलापूरकर संपादक यावेळी संस्थेच्या सल्लागार श्रीमती कल्पना रेडेकर,श्री इम्तियाज सय्यद ,श्रीमती विजया मिरजकर,श्री प्रमोद महागांवकर , किशोर सलवदे तसेच चतुरसिंग बायस, ऋतुजा कुंभार,अश्विनी बंडगर , पद्माकर शिंदे आदि शाखेतील स्टाफ उपस्थित होते.








