महावितरणचा २१ वा वर्धापन दिन बारामती ‘उर्जाभवनात’ उत्साहात साजरा


बारामती दि ०६ जून , ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कंपनीचा (महावितरण) २१ वा वर्धापन दिन उर्जाभवन बारामती परिमंडळ कार्यालयात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महावितरण कंपनीच्या वाटचालीचा आलेख व सद्यस्थिती मांडून कंपनीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्र.)श्रीकृष्ण वायदंडे, बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महावितरण कंपनीच्या प्रगतीसाठी योगदानाची संकल्प शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्र.)श्रीकृष्ण वायदंडे तर सूत्रसंचालन व्यवस्थापक (मानव संसाधन) रामकृष्ण वाघमोडे यांनी केले.



