Nation

शंकरनगर आश्रम शाळेचा यंदा दहावीचा ९२ % निकाल, गंगाराम कुंभार प्रथम तर कु श्रेया कांबळे द्वितीय

यशस्वी विद्यार्थ्यांचे होतेय अभिनंदन


विंचूर , द.सोलापूर , दि ९ ,( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
शंकरनगर (विंचूर) येथील श्री सेवालाल माध्यमिक आश्रम शाळेचा दहावीचा निकाल ९२.३० टक्के लागला.
या शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ४८ उत्तीर्ण झाले. निकाल ९२.३० टक्के लागला. या शाळेत प्रथम , द्वितीय व तृतीय आलेले तीन विद्यार्थी व त्यांना मिळालेली टक्केवारी अशी,
प्रथम गंगाराम सिद्धलिंग कुंभार ९० टक्के, द्वितीय कु. श्रेया जगदेव कांबळे ७५.६० टक्के व तृतीय काशिनाथ आप्पासाहेब कुंभार ७३ टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था तसेच शंकरनगर ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.


या शिवाय नुकतेच बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्येही शंकरनगर आश्रमशाळेने आपली यशाची चढती कमान कायम ठेवली. येथील आर्टस अँड सायन्स कॉलेजचा बारावीचा निकाल ही ९१.१२ टक्के इतका विक्रमी लागला. यामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक संचिता राठोड ६९.८३ टक्के, द्वितीय क्रमांक समर्थ पवार ६१ टक्के व संजना शिरोडकर ५१.८३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. तर कला शाखेचा निकाल ७३.६८ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक संगीता कांबळे ६०.३३ टक्के, द्वितीय क्रमांक खंडू केसकर ५५ टक्के व तृतीय क्रमांकाने लक्ष्मी कोरे ही ५४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठोड, उपाध्यक्ष पद्माजी वडते गुरुजी, सचिव लता राठोड, सहसचिव सुश्रुत राठोड व संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य रवींद्र मेघराज राठोड व मुख्याध्यापक बाळासाहेब पारगोंडे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button