Nation

बरुर येथे पाच वर्षाच्या पुतण्याचा काकाने केला खून

मंद्रूप पोलीस ठाण्यात काका विरोधात गुन्हा दाखल


मंद्रूप,दि.६ जून ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे अज्ञात कारणावरून काकाने आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याचे घटना उघडकीस आली आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार (वय ५, रा. मूळगाव अंजूटगी (ता. इंडी, जिल्हा विजयपूर,हल्ली बरुर)असे खून झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचा काका अंकुश परसाप्पा कास्तार (वय २५),रा. बरुर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, समर्थ हा मुलगा बरूर येथील आजी शोभा बगले यांच्याकडे राहत होता. तर त्याचा काका अंकुश हाही त्यांच्या घराजवळच राहण्यास होता. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अंकुश याने समर्थ याला घरी बोलावले. तेव्हा काकाकडे जातो असे सांगून तो घरातून गेला. थोड्यावेळाने अंकुश याने बेशुद्ध अवस्थेत समर्थला उचलून आणले. तो पत्र्यावरून पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्यावर व व्हनवूटीला जखमा झालेल्या दिसल्या तसेच गळ्यावर काळे व्रण पडले होते. समर्थ याला त्यानंतर तातडीने खाजगी दवाखान्यात नेले. सोलापूरच्या खासगी रुग्णालयात तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवाविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये समर्थ याला गळा दाबून मारल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. आज संशयित आरोपी काका अंकुश कास्तार याला ताब्यात घेतले. आरोपीने या मुलाचा कोणत्या कारणाने गळा आवळून खून केला याचा तपास पोलीस करीत आहेत. याप्रकरणी आजी शोभा बगले यांनी फिर्यादी दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button