Nation

‘एक झाड,एक विद्यार्थी’ तळभंडारे फाउंडेशनचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन मोहिमेचा शुभारंभ.

सोलापूर, दिनांक 6 जून ( प्रतिनिधी डॉ.सिद्धार्थ तळभंडारे)
दिनांक 05 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळभंडारे फाउंडेशन तर्फे हिप्परगा तलाव परिसरात देशी झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आजचा एकच दिवस वृक्षारोपण न करता येथून पुढे महिनाभर वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली जाणार असल्याचा संकल्प फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी एक झाड एक विद्यार्थी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितले . त्याचप्रमाणे आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्मृतिदिनानिमित्त त्या परिवाराच्या वतीने देशी झाडाचे वृक्षारोपण आणि त्याचे जतन व संवर्धनाची जबाबदारी अशा समाज उपयोगी कार्यक्रमांवर देखील भर देण्यात येणार आहे.
सोलापूर शहर व परिसरातील विद्यार्थी ,पालक, सामान्य नागरिक ,स्वयंसेवी संस्था यांना वरील उपक्रमासाठी फाऊंडेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी तळभंडारे फाउंडेशन सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ नागेश तळभंडारे, उपाध्यक्ष-डॉ. पुष्पांजली सचिन इंगळे, सचिव-श्रीमती मंदाकिनी नागेश तळभंडारे, सहसचिव-डॉ.सचिन गौतम इंगळे, प्रशांत विजयकुमार सोनवणे, तळे हिप्परगा येथील शेतकरी नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button