
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन
विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार, सामाजिक,आर.टी.आय कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा

सोलापूर (प्रतिनिधी) — दैनिक लोकशाही मतदारचे तसेच धसका न्यूजचे युवा संपादक अक्षय बबलाद (कांबळे) यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने आज सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद येथील बागेत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी अक्षय बाबलाद यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात अक्षय बबलाद यांचा भव्य सत्कार करण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रात कर्तव्यनिष्ठपणे काम करत असताना समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांना प्राधान्य देणे तसेच शिस्तबद्ध कार्यपद्धतीने पत्रकारितेची जबाबदारी पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सत्कारमूर्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. हा सत्कार सोहळा तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने तसेच अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. समाजहित, पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा, आणि नविन पत्रकार क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणू हा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार लतीफ नदाफ, गिरमल्ला गुरव, अनिल शिराळकर, सिद्धाराम नंदर्गी, सलाउद्दीन शेख, नागेश पासकंटी, अस्लम नदाफ, अमोल कुलकर्णी, राजाभाऊ बेळ्ळेनवरू, वैजिनाथ बिराजदार, योगेश कल्याणकर, अकबर शेख, डॉ. राम हुंडारे, आर. डी. जाधव, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, संगप्पा कांबळे, निम्मल, जहीर नदाफ, मोहन थंळगे, सोहेल जागीरदार, यासिन शेख, नागनाथ गणप्पा, नबी तांबोळी, भिमा वावरे, शाहीद शेख, अशोक ढोणे, इम्तियाज अक्कलकोटकर, विजयकुमार उघडे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आर.टी.आय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे मांडणारी आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता ही लोकशाहीची महत्त्वाची ताकद असल्याचेही मत यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. वाढदिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अकबर शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धाराम नंदर्गी यांनी मानले



