Nation
Trending

ॲड.अमन आंबेडकरांचा सोलापूरमध्ये युवा संवाद उत्साहात संपन्न

युवकांच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर एल्गार

सोलापूर: (प्रतिनिधी हरिष फडतरे) रिपब्लिकन युवा सेनेचे ॲड. अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला ‘पश्चिम महाराष्ट्र युवा संवाद दौरा’ सोलापूर येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या दौऱ्यादरम्यान आयोजित विशेष संवाद मेळाव्यात सोलापूर आणि परिसरातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या मेळाव्यात ॲड. अमन आंबेडकर यांनी उपस्थित तरुण-तरुणींशी थेट आणि मनमोकळा संवाद साधला. आजच्या युगात युवकांसमोर उभे ठाकलेले उच्च शिक्षणातील अडथळे, वाढती बेरोजगारी, आर्थिक संधींचा अभाव आणि स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या समस्या यांवर बैठकीत सखोल आणि आक्रमक चर्चा झाली. केवळ भाषणे न देता युवकांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून घेत ते सोडवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर कशी मांडणी केली पाहिजे, यावर त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले.

सामाजिक परिवर्तनात युवकांचा सक्रिय सहभाग गरजेचा –

युवकांच्या ज्वलंत प्रश्नांना एक मजबूत आणि थेट व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय समस्या संघटितपणे सरकारच्या दरबारी मांडणे आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, हा या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या दृष्टीने सोलापूरमधील हा संवाद दौरा अत्यंत यशस्वी आणि प्रभावी ठरला.

‘रिपब्लिकन युवा सेना युवकांच्या हक्काचे विचारपीठ’ – ॲड. अमन आंबेडकर

यावेळी बोलताना ॲड. अमन आंबेडकर म्हणाले, “आजचा युवक दिशाहीन नसून त्याला योग्य संघटित ताकदीची आणि हक्काच्या व्यासपीठाची गरज आहे. युवकांच्या न्यायासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या हक्कासाठी रिपब्लिकन युवा सेना रस्त्यावरील लढ्यापासून ते कायदेशीर लढाईपर्यंत सदैव युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”या संवाद मेळाव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील युवकांमध्ये नवीन ऊर्जेचा आणि संघटित होण्याचा नवा उत्साह संचारला असून, रिपब्लिकन युवा सेनेचे संघटन सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.या युवा संवाद मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सागर गायकवाड,विदर्भ नेते दिनेश आगमाने,युवा नेते यशवंत भालेराव रिपब्लिकन सेना सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे, विश्वजीत सरवदे – लोकसभा युवक जिल्हाध्यक्ष, शरणू हजारे – शहराध्यक्ष, सिद्धार्थ कांबळे – लोकसभा जिल्हा संघटक,महबूब शेख – अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, सुबोध सोनकांबळे – शहर युवक अध्यक्ष, इम्रान बागवान – शहर महासचिव, किरण जौंजट – शहर उपाध्यक्ष, विकी बनसोडे – शहर सचिव, सद्दाम भाई पठाण – जिल्हा मीडिया प्रमुख, वाहिद मुस्तफा – जिल्हा सचिव, नबीलाल खरादी – शहर संघटक, मतीन सातखेड – शहर युवक सचिव, इंजि. संघपाल काकडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button