Nation

गणेश काशिनाथ पोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कंदलगांव, दि ०९ जून ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील गणेश काशिनाथ पोतदार, वय ५५ वर्षे यांचे आज मंगळवार दि. ०९ जून रोजी एकच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ पोतदार यांचे जेष्ठ सुपत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन, मुले, सून, दोन भाऊ, एक बहीण व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गणेश पोतदार हे नेहमी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असायचे. त्यांच्या मनमिळावू आणि हसमुख स्वभावामुळे त्यांनी गावात मोठा मित्रपरिवार जोडला होता, त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी दहा वाजता कंदलगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button