घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

फौजदार चावडी पोलीस ठाणे डी बी पथकाची उत्कृष्ठ कामगिरी

सोलापुर, दि.२७ मे, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या ०२ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेवुन घरफोडी व मोटारसायकल चोरी असे ०२ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाणे डी.बी. पथकाने दिली
दिनांक १३/०५/२०२६ रोजी सकाळी फौजदार चावडी पोलीस ठाणेस माहीती मिळाली की, फलॅट नं.बी-१७ दुसरा मजला, पंधे अपार्टमेंट, अभीमानश्री नगर, सोलापुर येथे संजय येवुलकर यांचे राहते घरी घरफोडी झाली आहे. सदर घराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाट तोडुन १,००,७००/- रु. किंमतीचा मुददेमाल घरफोडी करुन चोरी करण्यात आला होता. सदर ठिकाणी मा.सहा. पोलीस आयुक्त सो. श्री प्रताप पोमण,मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत यांनी भेट देवुन फौजदार चावडी डी.बी.पथकाचे प्रमुख सपोनिरी/संजय क्षिरसागर व डी.बी. पथकास सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. व फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३७७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५,३३१(३),३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राउत यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सपोनि क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ सदर आरोपीताचा शोध सुरु केला. तपासादरम्यान फिर्यादी यांचेकडे चौकशी करता ते दिनांक ११/५/२०२६ रोजी रात्री ११.०० वा गावी गेले होते ते दिनांक १३/५/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वा घरी आले तेंव्हा त्यांना त्यांचे घर फुटलेले दिसले अशी हकीकत त्यांनी सांगीतली. त्यानंतर डीबी पथकाने सदर ठिकाणचे घटनास्थळी आजुबाजुस चौकशी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता परंतु घटनास्थळापासुन दुरच्या एका कॅमे-यात एक मोटारसायकल आल्याचे अस्पष्ट दिसत होते. सदर मोटारसाकयल आल्याचे दिशेला तपास करता सदर ठिकाणी गॅस धारकांचे काही पेपर पडल्याचे दिसले. सदर पेपरवरुन नमुद गॅस एजन्सीमध्ये जावुन तपास करता सदर पेपर हे किसान शिंदे रा. वसंत विहार,सोलापुर या गॅस एजन्सीत काम करणारे इसमाकडे काही ग्राहकांचे गॅस कनेक्शन काढण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले. किसान शिंदे यांचेकडे जावुन तपास करता त्यांची एच.एफ.डीलक्स मोटारसाल घरासमोरुन दिनांक १२/५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास चोरीस गेल्याचे त्यांनी सांगीतले.त्याप्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे २. गु.र.नं.३८०/२०२६ भा. न्या.सं.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर सपोनिरी/क्षिरसागर व पथक यांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता कोठेही काही पुरावा मिळत नव्हता परंतु पुणे हायवे वरील बाळे ब्रिज येथे संशयीत दोन आरोपीत हे नमुद मोटारसायकलवर जाताना पहाटे ०४.४५ वा सुमारास अस्पष्ट दिसले. परंतु त्यानंतर कोठेही सीसीटीव्ही फुटेज नव्हते. त्यांनतर डी.बी. पथकाने सदर कालावधी नुसार अंदाज बांधुन सोलापुर शहरातुन बाहेर जाणारे सर्व रोड व त्यावरील टोल नाके तपासले असता सोलापुर धाराशीव रोडवरील तामलवाडी टोल नाका येथे सदर संशयीत आरोपीत दिसले परंतु रात्रीची वेळ “असल्याने पुन्हा अस्पष्ट दिसले यावरुन आरोपीतांचा मार्ग फक्त पोलीसांना समजला. त्यानंतर आरोपीत याची गुन्हा करण्याची पध्दत याचा अभ्यास करुन सपोनिरी/क्षिरसागर व त्यांचे पथकाने अशा पदधतीने गुन्हे करणारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील आरोपीतांची माहीती घेतली त्यानुसार विशाल तांदळे रा.मंचर पुणे या नावाचा आरोपीत याची गुन्हा करण्याची पदधत याच प्रकारची असुन तो एक महिन्यापुर्वीच येरवडा जेल मधुन सुटला आहे अशी माहीती मिळाली. त्याप्रमाणे सदर आरोपीबाबत गुप्त बातमीदार यांचेकडुन माहीती घेता सदर गुन्हा हा विशाल तांदळे व त्याचा साथीदार शाहुराज कोकरे यांनी केल्याची माहीती मिळाली. दोन्ही आरोपीत यांची माहीती काढली असता ते रेकॉर्डवरील घरफोडी व जबरी चोरी करणारे आरोपीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील डी.बी पथकाचे सपोनिरी/क्षिरसागर व पथक यांनी मंचर, ता. आंबेगाव जि.पुणे येथे तपास कामी जावुन आरोपीत नामे १. आरोपीत विशाल दत्तात्रय तांदळे वय २९ वर्षे रा. मंचर ता.आंबेगाळ. जि, पुणे यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याचा साथीदार २. आरोपीत शाहुराज बाबासाहेब कोकरे वय २६ वर्षे यास घाटा पिंपरी, ता. अष्टी, जि, बीड येथुन ताब्यात घेतले व त्यांचेकडे कसुन चौकशी करता त्यांनी वरील नमुद दोन्ही गुन्हे केल्याचे कबुल केले. व त्यांचेकडुन १.गु.र.नं. ३७७/२०२६ भा. न्या.सं. कलम ३०५,३३१ (३), ३३१ (४) २. गु.र.नं.३८०/२०२६ भा.न्या.सं.कलम ३०३ (२) हे दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत व सदर गुन्हयात चोरीस गेलेली एच.एफ.डीलक्स मोटारसायकल तसेच चोरीस गेलेला मुददेमालापैकी रोख रक्कम व १० ग्रॅम चांदीची चैन असा एकुण ६४,२००/- रु. किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे. अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डी.बी.पथकाने गुन्हा घडल्यापासुन दिवस रात्र आरोपीचा शोध सुरु ठेवुन सातत्य पुर्ण तपास करुन सदर गुन्हा उघड केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. एम.राजकुमार, मा.पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. प्रीतमकुमार यावलकर, मा.सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण, व.पो.नि. श्री. महादेव राउत, यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमुख सपोनि/ श्री. संजय क्षिरसागर, पोहवा / बसवेश्वर परीट, पोना शिवानंद भिमदे, पोका कृष्णा बडुरे, पोकॉ/विनायक जाधव, पोकॉ/ पंकज घाडगे, पोकॉविनोद व्हटकर, पोकॉविनोद पुजारी, पोका/ज्ञानेश्वर गायकवाड, पोका अमोल खरटमल, पोकॉ/रवी धेंडे, पोकाअजय चव्हाण, पोका सुरज सोनवलकर, पोहवाअयाज बागलकोटे, पोकॉ मोरे यांनी केलेली आहे.



