Nation
Trending

आंतरराष्ट्रीय धम्म ध्वज दिनानिमित्त सोलापूरात वार्षिक कॅलेंडरचे प्रकाशन

सोलापूर, दि. ८ (प्रतिनिधी शांताराम वाघमारे):
आंतरराष्ट्रीय धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या वतीने पार्क चौक, सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संस्थेच्या सन २०२६ या वर्षाच्या वार्षिक कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

या कॅलेंडरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध तसेच इतर महापुरुषांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक व सामाजिक घडामोडींची माहिती तारखेनुसार नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगद मुके यांनी केले.

यावेळी संस्थेचे सल्लागार बाळासाहेब सरवदे, खजिनदार शांताराम वाघमारे तसेच सदस्य शिवपुत्र घटकांबळे यांनी धम्म ध्वजाचा इतिहास, त्याचे महत्त्व तसेच धम्म ध्वजाचा दैनंदिन जीवनात वापर करताना पाळावयाचे नियम याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास
बाळासाहेब सरवदे, डॉ. अंगद मुके, शांताराम वाघमारे, गौतम चंदनशिवे, मिलिंद कोरे, शिवपुत्र घटकांबळे,श्रीमंत गायकवाड, गोपी कांबळे, चंदू कांबळे, आनंद काळोखे, राजू ओहळ, अशोक दिलपाक, नागेश गायकवाड इत्यादी मान्यवर सदस्य उपस्थित होते तसेच यशसिध्दी संघटनेचे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी मेजर बनसोडे हे सपत्नीक हजर होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सदस्य मिलिंद कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूणच हा कार्यक्रम खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button