
तामलवाडी पोलिसांकडून 24 तासात आरोपीला अटक

तुळजापूर,दि.८, (प्रतिनिधी सुरज थोरात)
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिर-भावजयीतील अनैतिक संबंधाच्या वादातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची गंभीर व संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीस अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. कोळसूर (ता. उमरगा) येथील ओंकार देविदास कांबळे याने आपल्या भावजयीशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती मृतक मुलगा वडिलांना सांगत असल्याचा मनात निर्माण झालेल्या रागातून चुलत्याने पुतण्या कृष्णा उर्फ सदानंद कांबळे (वय १३) याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदानंद हा कधी आई सोबत तर कधी वडिलांसोबत राहत असे. कुटुंब परस्पर नातेसंबंधात असून तामलवाडी शिवारात कदम यांची शेती असून,सदरची शेती कोरे हे बटई ने करत असतात, त्या शेतात काम करण्यासाठी सलगाडी म्हणून ओमकार देविदास कांबळे हे त्याच्याच भावजई नाव ज्योती कांबळे व मुलगा कृष्णा (सदानंद) कांबळे सोबत राहत होता.
दीर भावजय यांच्या प्रेमसंबधात कृष्णा अडसर ठरत होता. याचाच मनात राग धरून आरोपी ओमकार कांबळे याने
दिनांक१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन कृष्णाला तामलवाडी साठवण तलाव परिसरात तेथे विद्युत पंपास पाईप जोडायचे आहेत असे सांगून नेले. निर्मनुष्य ठिकाण असण्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्रणे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावालगतच्या गवतामध्ये टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
दि ५जानेवारी साय. ४वाजताच्या सुमारास
धनाजी नेटके तलाव परिसरात जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्यांना गवतामध्ये मृतदेहाचा एक पाय दिसून आला. त्यांनी तात्काळ तामलवाडी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. प्राथमिक अहवालानुसार कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर तामलवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तपासणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी तलमोड ता. उमरगा येथील टोलनाका परिसरातून घराकडे परतत असताना तामलवाडी पोलिसांनी ओंकार कांबळे स ताब्यात घेण्यात आले.तामलवाडी पोलीस ठाण्यात आणून चोकशी केली, सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक ऋतू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



