Nation
Trending

जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेत दादपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे यश

सोलापूर दि.१५ ( मोहोळ प्रतिनिधी सुधाकर कसबे )

जिल्हा परिषद सोलापूर मार्फत घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी गुणवत्ता शोध जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये लहान गटातून शाळेतील इ.५ वी तील विद्यार्थिनी कु.प्रांजल लक्ष्मण पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावून या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

प्रथम केंद्रस्तरीय स्पर्धेतून प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.यानंतर तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये कथाकथन स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेत तालुक्यातील १५ केंद्रातून ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.तालुकास्तरीय स्पर्धेतून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यातील ११ तालुक्यातून एकूण २२ स्पर्धक सहभागी झाले होते.या जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करताना तिने द्वितीय क्रमांक पटकावला.

तिने स्वतःच्या वक्तृत्व व कथाकथन कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले मुळात सर्वगुण संपन्न असणाऱ्या प्रांजल पाटील हिस शाळेचे मुख्याध्यापक,तिचे वर्गशिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशामुळे जिल्ह्यात शाळेच्या व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

तिच्या या यशाबद्दल मोहोळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांनी तिचे कथाकथन ऐकून प्रभावित झाले व तिच्या या यशाबद्दल व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या व बहुमोल असे मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अतुलकुमार माने ,बंडू शिंदे , कुरुल केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार राऊत यांनीही तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

तिच्या या यशाबद्दल दादपूर शाळेचे मुख्याध्यापक,शा.व्य.समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत दादपूरचे सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button