Nation

महामानवाच्या जयंती दिनानिमित्त स्त्रीरोग व बालरोग आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचारमंच आणि अमर भीम तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

मोहोळ, दिनांक 24 (प्रतिनिधी सुधाकर कसबे)
भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंच सोलापूर व अमर भीम तरुण मंडळ, मलिकपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मलिकपेठ येथे भव्य स्त्री रोग व बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. मयुरी पाटील, डॉ. पृथा कल्याणी, डॉ. पवित्रा कसबे-दामोदरे यांनी महिलांच्या समस्याचे निराकरण करून पुढील उपचाराचा सल्ला व मार्गदर्शन केले . सोबतच डॉ. जयप्रकाश पाटील यांनीही मुलांच्या समस्याचे निराकरण करण्याविषयी मार्गदर्शन केले.

या शिबिरात 80 हून अधिक महिलांनी तर 50 हून अधिक बालकांनी आपला सहभाग नोंदवला. आरोग्य तपासणीसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमर भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष – प्रवीण कसबे, उपाध्यक्ष – श्रीनिवास राशेराव, खजिनदार – अक्षय कसबे, सचिव – अमोल कसबे, आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंचचे अध्यक्ष – कपिल शंके, सचिव – इंद्रजीत कांबळे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

यावेळी साकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष – राज लोखंडे, दत्ता कसबे, विकास कसबे, गुरुनंद कसबे, सुधाकर कसबे, संध्या कसबे, ममता कांबळे, मोनिका सर्वगोड, उज्वला कोन्हेरीकर, नूतन माने, राणी भोसले, दिव्या कसबे, अंजली कसबे, अनुराधा कसबे, संगीता कसबे, उषा कसबे, शितल कसबे व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button