
देवकुरळी ता. तुळजापूर, दिनांक ७,(प्रतिनिधी:सुरज थोरात) समाजातील वंचित, पीडित घटकांना आधार देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती देवकुरळी येथे पंचशील तरुण मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय, संघर्षपूर्ण व प्रेरणादायी जीवनकार्याचा गौरव केला. समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांनी दिलेले योगदान, महिलांना दिलेली प्रेरणा आणि समतेचा संदेश यावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष महादेव थोरात होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष धीरज थोरात, सचिव ओमकार मस्के यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील महिला भगिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रम शांततामय व अनुशासित वातावरणात पार पडला. शेवटी माता रमाई आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, बंधुता व न्यायाची मूल्ये रुजवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.





