Nation

ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांची धडक कारवाई

४ महिलांसह १० जणांवर गुन्हा दाखल; ₹४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त



मंद्रुप, दि. २१ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर – विजापूर रोडवरील वडकबाळ गावाच्या शिवारात सुरू असलेल्या अवैध ऑर्केस्ट्रा बारवर मंद्रुप पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. सदर ठिकाणी विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १० पुरुष व ०४ महिला अशा एकूण १४ जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३१/२०२६, BNS कलम २९६, ३(५) व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ऑर्केस्ट्रा बारमधील साहित्य, मोटारसायकल तसेच रोख रक्कम असा एकूण ₹४,८२,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 4 महिलांसह 10 जणांवर कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

  1. मनोज माधव पाटील, रा. फ्लॅट नं. ९१, पापारामनगर, विजापूर रोड, सोलापूर — ग्राहक.
  2. अमर अशोक तोडकरी, वय २५ वर्षे, रा. पंचशील नगर, इंडी, जि. विजापूर.
  3. वीरेश बसवराज शेट्टर, रा. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
  4. परमानंद उदयकुमार पोतदार, वय २३ वर्षे, रा. गांधी चौक, इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
  5. बसवराज शांताप्पा कुंटाजी, वय २१ वर्षे, रा. मार्केट यार्ड, इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
  6. शांताप्पा साहेबानू हदगल, वय २८ वर्षे, रा. शांतिश्वर टेम्पल, विजापूर, कर्नाटक.
  7. सोमय्या बसय्या मठपती, वय ३६ वर्षे, रा. बगले प्लॉट, इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
  8. महेमद हिदायतुल्ला माशाळकर, वय ५० वर्षे, रा. शापेट मेन रोड, विजापूर, कर्नाटक.
  9. उमेर फारुक अब्दुल लतीफ बगली, वय ३६ वर्षे, रा. के.के. जि.एस. जवळ कासगिरी गल्ली, विजापूर, कर्नाटक — कामगार.
  10. रियाज हारून आवटे, वय २८ वर्षे, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर.
    सदर आरोपींविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात विविध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग, पोलीस हवालदार उत्तम सासवे, पोलीस नाईक सिकंदर मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल अशोक मियावाले, पोलीस कॉन्स्टेबल बिरण्णा वाघमोडे, महिला पोलीस अंमलदार पूजा काळे, पोलीस कॉन्स्टेबल विद्या कांबळे तसेच चापोहेकॉ नानासाहेब अवघडे यांनी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button