Nation

बेपत्ता अर्पिता 07 तासांच्या आत तिच्या नातेवाईकांकडे सुपुर्द ;

सोलापूर शहर गुन्हे शाखेची उल्लेखनिय कामगिरी.

सोलापूर दि ३१ मे , ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) अर्पिता मल्लिकार्जुन बगले वय 10 वर्षे मुळ रा.मु.पो. माळकवठे, ता.द. सोलापूर ही तिचे सोलापूर येथील नातेवाईक शुभम रेवणसिध्द बिराजदार रा. 11/25 बसवेश्वर निवास बसवनगर भवानी पेठ सोलापूर यांचेकडे राहणेस आली होती. दिनांक 29/05/2026 रोजी सकाळी 09:30 वा.चे सुमारास अर्पिता बसवेश्वर निवास येथून बाहेर गेली असता बेपत्ता झाली होती. त्याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गु.र.नं.482/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वरील प्रमाणे घटना घडल्यानंतर श्री. एम राज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ. अश्वीनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर मुलीचा तात्काळ शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे व त्याचे आजूबाजूचे परिसरामध्ये सी.सी.टी.व्ही. फुटेजची बारकाईने पाहणी केली असता अर्पिता ही कुंभार वेस, मधला मारूती, टिळक चौक मार्गे अश्वीनी हॉस्पिटल कडे गेल्याचे दिसून आल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर मुलीचा कसोशीने शोध घेत होते.

त्यानंतर बेपत्ता मुलगी अर्पिता ही अश्वीनी हॉस्पिटल ते रिमांड होमचे दरम्यान दिसून आल्याची माहिती गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार संजय साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पो.स.ई मुकेश गायकवाड व इतर पोलीस अंमलदार यांनी तात्काळ प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून शोध घेतला असता अर्पिता त्या ठिकाणी मिळून आली. त्यानंतर अर्पिता हिस तिच्या नातेवाईकां समक्ष विचारपूस केली असता ती रस्ता चुकल्याने घर शोधत फिरत असल्याचे निष्पन्न झाले.

अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बेपत्ता अर्पितास अवघ्या 07 तासामध्ये शोधून तिच्या नातेवाईकांकडे सुखरूपपणे सुपुर्द केले.

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त,राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, वाजिद पटेल, योगेश बर्डे, महेश शिंदे, शैलेश बुगड, संजय साळुंखे, अजिंक्य माने, अभितीत धायगुडे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, सिध्दाराम देशमुख, धिरज सातपुते, सुभाष मुंढे चालक बाळासाहेब काळे, शाम सुरवसे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button