भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्यावतीने CJI गवई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दि. ६ (प्रतिनिधी) – भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ सोलापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टरूममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा सोलापुरात तीव्र निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सरन्यायाधीश गवई यांच्या प्रतिमेस फुलांचा वर्षाव व दुग्धाभिषेक करून संविधान आणि न्यायव्यवस्थेप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडने म्हटले की, “देशाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नाही, तर भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे.”
संविधान हेच सर्वोच्च असून, कोणत्याही जाती-धर्मापेक्षा त्याचे स्थान वरचढ आहे. त्यामुळे हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, तसेच फिरोज सय्यद, गजानन शिंदे, सुलेमान पिरजादे, रमेश चव्हाण, रफिक शेख, सोहेल अन्सारी, मुजम्मिल कोरबू, इस्माईल मकानदार, मल्लिकार्जुन नायकोडे, जाफर मुंशी, दिनेश पाटसकर, बालाजी वाघे आदी उपस्थित होते.





