
सोलापूर,दिनांक 27.(प्रतिनिधी राहुल उडणशिव)
आज दिनांक 27/09/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वडकबाळ येथील सीना नदी पूरग्रस्त परिसरास भेट देवून आपत्तीग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मा. अधीक्षक महोदयांच्या हस्ते नागरिकांना एक वेळचे जेवण, नाष्टा तसेच उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आश्वासक समाधान आणि धीर निर्माण झाला.
संकटाच्या काळात पोलीस विभाग नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी यावेळी केले.
सदर प्रसंगी मा. श्री. सुजित नरहरे अप्पर तहसीलदार मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर,
श्री. मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रूप पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण तसेच पोलीस पाटील
श्री. अशोक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केलेला असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले व पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच शासन व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन
मा. पोलीस अधीक्षकांनी केले.





