Nation
Trending

सिना नदीच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संभव फाऊंडेशनचे आवाहन

सिना नदीच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेत पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीच्या महापुरामुळे शिंगोली, पिर टाकळी आणि शिरापुर (मो) या गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली असून शेतं उद्ध्वस्त झाली आहेत. या कठीण परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. आग्रेजा चिटणीस मॅडम यांनी प्रत्यक्ष दौरा करून पुरग्रस्तांचा आढावा घेतला.

डॉ. चिटणीस मॅडम यांनी गावागावांत जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांची माहिती घेतली. पुरामुळे घरातील संसारपयोगी वस्तू, धान्य, वीज व पाणी यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून पुरग्रस्तांना चादरी, पाणी व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उघड्यावर थंडीत व पावसात रात्र काढणाऱ्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला.

मात्र अजूनही अनेक कुटुंबांना तातडीच्या मदतीची गरज आहे. अन्नधान्य, औषधं, कपडे, पिण्याचे पाणी, टॉर्च, स्वच्छतेची साधनं आणि निवाऱ्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.

आपल्या परीनं शक्य तेवढी मदत पुढे करून या पुरग्रस्तांना हातभार लावावा, हा आमचा सर्वांना आवाहन आहे.

संकटाच्या या काळात एकत्र उभं राहणं हीच खरी मानवतेची ओळख आहे.

आपला

आतिश कविता लक्ष्मण

संभव फाऊंडेशन, सोलापूर

९७६५०६५०९८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button