Nation

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कंदलगावसह मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीतील गावात पोलिसांचा 'रूट मार्च'; मंद्रूप पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांनी शांततेत मतदानाचे आवाहन

मंद्रूप पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांनी शांततेत मतदानाचे आवाहन



​कंदलगाव, दक्षिण सोलापूर, दि ५ ,(प्रतिनिधी राहुल उडाणशिव) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची तोफ आता थंडावली आहे. प्रचाराचा धुराळा थांबताच आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज पोलिसांनी कडक ‘रूट मार्च’ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.

​ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप, कंदलगाव, भंडारकवठे, निंबर्गी सह मंद्रूप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये आज पोलिसांनी संचलन केले. गावातील मुख्य चौकासह गल्लोगल्लीतून रूट मार्च काढून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नियमांचे पालन करण्यात यावे यासाठी आवाहन आणि चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी इशारा दिला आहे.
प्रचार थांबल्यानंतरच्या काळात छुप्या पद्धतीने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामान्य नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.
​ या संचलनादरम्यान मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, PSI राजू डांगे, ग्रेड PSi रवींद्र चव्हाण, यांच्या टीम सह होमगार्डच्या जवानांनीही संचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button