Nation
Trending

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत वृक्षारोपण!.

सचिव अरुण धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान, जनजागृती व आरोग्य शिबिर संपन्न!.

सोलापूर : श्री मंगलदास क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळा, मजरेवाडी, सोलापूर येथे संस्थेचे सचिव अरुण धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, नेत्रदान जनजागृती दिन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर. ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांचा कार्याचा गौरव केला .
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करताना, “प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आपली व सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगितले. तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. वैभव राऊत यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. नेत्रदानाचे महत्त्व समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाप यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून पर्यावरणाची काळजी घेणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि आरोग्याविषयी जागरूक राहणे याबाबत मार्गदर्शन केले.

महानगरपालिकेच्या नगरसेविका. सुमन जीवन चाबुकस्वार आणि संस्थेचे सचिव अरुण धोत्रे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी बनले पाहिजे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थी शिक्षण घेऊन शासकीय अथवा खासगी क्षेत्रात नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावेत, यासाठी संस्था सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

मजरेवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा सरोदे यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला नेत्रतज्ज्ञ डॉ. मल्लिनाथ जेऊरे, वृक्ष संवर्धन समितीचे मनोज देवकर, सामाजिक कार्यकर्ते महेश देवकर, संस्थेच्या खजिनदार शोभा अरुण धोत्रे, पत्रकार राम हुंडारे, विशाल पाटील, मुल्ला, सत्यम गायकवाड, गौतम थापटे, नरेंद्र धोडमणी, बसवराज जेऊरे, महबूब बडेखान, गौरी धोत्रे, शकुंतला धोत्रे, निलोफर शेख स्टाप नर्स
वंदना कांबळे आरोग्य सेविका
भिमाशंकर बावगे प्रयोगशाळा त
जावेद शेख औषध निर्माण अधिकारी.सर्व आशा वर्कर अधिकारी.सर्व यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, नेत्रदान जनजागृती आणि आरोग्य शिबिरासारखे उपयुक्त उपक्रम राबविण्यात आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजयकुमार लोंढे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button