
तुळजापूर | प्रतिनिधी(सुरज थोरात)
तुळजापूर शहरात कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणात ८जणांसह इतराविरोधात तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.
गोपनीयतेच्या माहितीनुसार, कुलदीप मगर यांच्यावर अचानकपणे हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तुळजापूरDYSP निलेश देशमुख यांच्या आदेशाने DYSP कार्यालयातील विशेष पथकाने विविध ठिकाणाहून संशयितांचा माग काढला व आरोपीना अटक केली.
या कारवाईत चेतन शिंदे, शेखर गंगणे, नंदू गंगणे, अतुल दळवी आणि सोनू कदम या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून घटनेबाबत सखोल चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्ववैमनश्यातून का काय?यासाठी इतर संभाव्य साथीदारांचा तपास केला जात आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी कुलदीप मगर यांना त्वरित वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच इतर आरोपिंना अटक होण्याची शक्यता, पोलिसांनी व्यक्त केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास तुळजापूर पोलीस काटेकोरपणे करत असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




