टाकळीच्या विशाल दुधभाते याची अमेरिकन कंपनीत झाली निवड

टाकळी ग्रामस्थांनी केला सत्कार

टाकळी, दक्षिण सोलापूर दि. ११ मे. ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील विशाल कल्लाप्पा दुधभाते याची मायलान लॅबोरेटिज लिमिटेड बेंगलुरु या (व्हीएक्ट्रीस कंपनी) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. याबद्दल त्याचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विशाल यांनी सोलापुरातील वि. गु. शिवदारे संस्थेत बी फार्मसी केले आहे. नुकतेच कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केला होता. यामध्ये सोलापूरसह सांगली व धाराशिव जिल्ह्यातील बी फार्मसी महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये १३६ विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. त्यामधून केवळ २४ जणांची निवड झाली. त्यामध्ये विशाल दुधभाते याचा समावेश आहे.
टाकळी गावातील गरीब कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी विशाल यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले. यावेळी त्याचा ज्येष्ठ नेते श्रीकांत बगले, दयानंद दुधभाते, खंडाप्पा दूधभाते, कुरघोटचे निलप्पा व्हनमाने, प्रगतशील शेतकरी चिदानंद बगले व माजी उपसरपंच बिराप्पा दूधभाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवशरण दूधभाते, बिरप्पा माने, भीमाशंकर सुरवसे, कल्लाप्पा कोळी, मल्लिकार्जुन दूधभाते, दत्ता कोळी, विक्रम दूधभाते व टाकळी कुरगुट येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



