Nation
Trending

विश्वरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हाॅस्पीटल) रक्तपेढीतर्फे उद्या दि ६ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

सोलापूर दि.५ (प्रतिनिधी). 

विश्वरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हाॅस्पीटल) रक्तपेढीतर्फे उद्या दि ६ डिसेंबर रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर रक्तदान शिबिर हे हुतात्मा स्मृति मंदिर पार्किंग येथे सकाळी ८ वाजता सुरू होईल . 

रक्तदान सिव्हिल हाॅस्पीटल / शासकीय रक्तपेढीतच का द्यावे?

विश्वरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ८:०० या वेळेत 

# BLOOD FOR BABASAHEB अर्थात 

#माझे रक्त बाबासाहेबांसाठी

या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग मधे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चला! रक्तदान करुन डाॅ. बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहू या!!

या शिबीरात जमा होणारे रक्त आम्ही शासकीय रुग्णालयाच्या म्हणजेच  श्री. छ. शि. म. सर्वोपचार रुग्णालय, सोलापूरच्या  रक्तपेढीतच देणार आहोत, कारण…

१) कारण.. आपण दिलेल्या रक्तामुळे  अपघातात जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचे प्राण वाचणार आहेत व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत.

२) कारण.. आपण दिलेल्या रक्तामुळे प्रसूतीवेळी रक्तस्त्राव झाल्यामुळे जीवन-मरण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मातेचा जीव वाचून एका तान्ह्या बाळाला तुम्ही आई देणार आहात.

३)कारण.. आपण दिलेल्या रक्तामुळे  हिमोफिलीया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त बालकांचे प्राण वाचवून त्याच्या आई-वडीलांना तुम्ही सुखी करणार आहात.

४)कारण.. आपण दिलेले रक्त सिव्हिल हाॅस्पीटल मधील गोरगरीब व अनाथ रुग्णांना कोणतेही पैसे न घेता मोफत दिले जाते, यामुळे आपले दान सत्पात्री ठरते.

५) कारण.. आपण दिलेले रक्त कोणताही मोबदला किंवा महागडी भेटवस्तू न घेता दिल्यामुळे ते खरेखुरे दान ठरते व दानाचे पुण्य मिळते, हे सम्यक कर्म होते व आपली दान पारमिता पुर्ण होण्यास मदत होते.

६) कारण… आपण रक्तदिल्यानंतर आपल्याला सन्मानपत्र दिले जाते ज्यावर तुमचा फोटो लावून तुम्ही अभिमानाने घरात, कार्यालयात लावू शकता व समाजात रक्तदाता म्हणून तुमच्याकडे आदराने पाहीले जाईल.

७) कारण… सोबत आपणास एक कार्ड दिले जाते. तीन महिन्यांपर्यंत गरज लागल्यास रक्तदात्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना एक बॅग मोफत रक्त दिले जाते.

८) कारण… आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर, शासन निर्णयानुसार रक्तदान केलेल्या दिवशी आपणास एक दिवसाची पुर्ण पगारी विशेष नैमित्तिक रजा देय आहे.

या सर्व कारणांसाठी मी स्वत: शासकीय रक्तपेढीलाच रक्तदान करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहणार आहे.

आपण करणार आहात काय?

-को ऑर्डिनेटर

#BLODD FOR BABASAHEB

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button