
🚨 महत्त्वाची सूचना-🚨
दि.16/09/2025
विषय:- नीरा व भीमा नदी काठच्या
नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
देणेबाबत.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज दि.16/09/2025 रोजी दु.4.30 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी 55000 क्सूसेक्स व विद्युत गृहातून 1600 क्सूसेक्स असा एकूण 56600 क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
तसेच आज दि.16/09/2025 रोजी सायं. 06.00 वाजता वीर धरणातून नीरा नदीपात्रात 7837 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु आहे.
उजनी व वीर धरणातील असा एकत्रित 103439 क्सूसेक्स विसर्ग संगम व 87913 क्सूसेक्स विसर्ग पंढरपूर येथुन भीमा नदीमध्ये सध्या वाहत आहे. घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (Inflow) नुसार विसर्गामध्ये अजून वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस सुरू असल्यामुळे भीमा नदी पात्रात अनियंत्रित विसर्ग येण्याची शक्यता आहे
त्यानुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये मध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करणेत याव्यात ही विनंती.
कार्यकारी अभियंता
भीमा पाटबंधारे विभाग
पंढरपूर