
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वन्ने वस्ती येथे दीपावली साहित्य प्रदर्शन उदघाटन कार्यक्रम समारंभ
दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी राहुल उडणशिव ) आज दिनांक 15/10/2025 रोजी स्वन्ने वस्ती जि. प शाळेत दीपावली साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रूप बीटचे विस्ताराधिकारी मा.आयुब कलबुर्गे होते.
प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे केंद्र प्रमुख मा. आमसिद्ध म्हेत्रे
व तसेच केंद्रीय मुख्याध्यापक मा. कल्लाप्पा धुमाळी, माजी केंद्र प्रमुख राजेंद्र कांबळे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय कोरे, राजकुमार कोरे, प्रभाकर इंगळे आणि BRC चे विषय तज्ञ् मा.सोमनाथ चांडोळे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. कैलास उडाणशिव, उपाध्यक्ष मा. संध्याराणी माने आदी मान्यवरांची सदरील कार्यक्रमास उपस्थिती लाभली ..
🏵️ प्रतिमा पूजन-
प्रथमत:डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जयंती निमित्त अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे हस्ते प्रतिमेचे पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वागतगीत-
उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेतील मुलींच्या स्वागतनृत्य गीतद्वारे करण्यात आले.
दीपावली साहित्य प्रदर्शन उदघाटन-
शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले….
पुष्पगुच्छ व चाकलेट हार
दीपावली शुभेच्छा कार्ड
आकाशकंदील
पणती पेंटिंग
ऐतिहासिक किल्ले
साहित्य मांडणीच्या सुंदर अशा दालनाचे उदघाटन…
मा. आयुब कलबुर्गी , मा. आमसिद्ध म्हेत्रे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
स्वागत व सत्कार-
शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले.
🌸 🌸 विशेष सत्कार…
आदर्श विस्तारअधिकारी म्हणून मंद्रूप शिक्षक पतसंस्थाकडून पुरस्कार प्राप्त आयुब कलबुर्गी
आदर्श केंद्रप्रमुख म्हणून अक्कलकोट शिक्षक पतसंस्था कडून पुरस्कारप्राप्त आमसिद्ध म्हेत्रे यांचा विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
बक्षीस वितरण –
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ऐतिहासिक किल्लेमधून विस्ताराधिकारी साहेब व केंद्रप्रमुख साहेब यांनी निवडलेल्या प्रथम,, द्वितीय आणि तृतीय क्रमांकच्या विद्यार्थ्यांचे त्यांचे पालकांसह सन्मान करून
प्रथम क्रमांक -151 /
द्वितीय क्रमांक -101/
तृतीय क्रमांक -51 चे बक्षीस साहेबांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आले.
दीपावली अभ्यास पुस्तिका वाटप-
प्रमुख सर्व मान्यवरांचे हस्ते सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांना दीपावली अभ्यास पुस्तिका देण्यात आले.
फराळाचे वाटप
केंद्रप्रमुख म्हेत्रे सर यांनी फराळसाठी 3 किलो बुंदी लाडू आणि BRC चे चांडोळे सर यांनी 3 किलो चकली दिले आहेत…..सर्व पालकांच्या वतीने त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या वतीने फराळ वाटप सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालका सह उपस्थित मान्यवर यांचे हस्ते भेटकार्ड आणि फराळ देऊन दीपावली सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मा. कलबुर्गी व म्हेत्रे यांनी आपल्या मनोगत मधून शाळेविषयी गौरवोदगार काढून शाळेत राबवीत असलेल्या अनेक उपक्रमाचे भरभरून कौतुक करीत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या माता पालक, SMC अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे शाळेला भरभरून मिळत असलेल्या अप्रतिम सहकार्यबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे सर्व पालक ‘ शाळा व्यवस्थापन समितेचे सर्व सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमला उपस्थित सर्व मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्वादिष्ठ व रूचकर जेवण बनविणाऱ्या पोषण आहारच्या अन्नपूर्णादेवी स्वयंपाकीताई यांचा दीपावली भेट म्हणून शाळेच्या वतीने त्यांना smc च्या उपाध्यक्षा यांच्या शुभ हस्ते साडीचा आहेर करून दिवाळी फराळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाळेच्या परिसरातील परसबाग पाहून सर्व मान्यवर आनंदी होऊन कौतुक केले.
निसर्गप्रेमी राजेंद्र कांबळे सर यांनी परसबागेची निगा कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करून पुढील भेटीच्या वेळी या परसबागेला भेट देऊन पाहणी करून बक्षीस देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शांता बोलदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पंडित साबा यांनी मानले.




