Nation
Trending

सोलापूर महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर आणि  सोलापूर ग्रामिण पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर धडक कार्यवाही 

सोलापूर दि, १२ ( प्रतिनिधी सूरज थोरात )

                         सोलापूर महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर व सोलापूर ग्रामिण पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये०६लाख ७१ हजार लाख ९१५ चा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व मा. श्रीमती भाग्यश्री पं.जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर,सौलपुर ग्रामिण पोलिस विभागाचे परिविक्षाधिन आय पी एस अधिकारी श्री पी एस राहुल, मा. श्री जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांचे समवेत दि. १२/०१/२०२६ रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे मुळेगाव तांडा, येथे केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, केलेल्या धडक कारवाईत एकुण ०८ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ०८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत १०,४२० लि. रसायन, ११७० लि. हा. भ. दारू ५१०० किलोग्राम काळा गुळासह एकुण रूपये ०६लाख ७१ हजार लाख ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडून ०१ जानेवारी २०२६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ९९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदर कारवाईत ४४,५९० लि. रसायन, ३९७३ लि. हा. भ.दारू ३९९ ब. ली. देशी मद्य, ५३ ब.ली. विदेशी मद्य, ११७ ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य, २१ ब.ली.बिअर, ६३५ ली. ताडी २२०० किलो मळी,५१०० किलोग्राम काळा गुळ व ०५ वाहनांसह रुपये ३६ लाख ८७ हजार ४१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ०८ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण ३२ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. 

                  हॉटेल याराना, हॉटेल रानवारा ढाबा, हॉटेल राजवाडा ढाबा, विलास कोल्ड्रिंक्स, विजापुर रोड कंबर तलाव परिसरातील चायनिज सेंटर, हॉटेल वैष्णवी ढाबा अश्या ढाब्यांवर कलम ६८ व ८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.तसेच या पुर्वीही विनापरवाना ठीकाणी (ढाबे व हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स सेंटर) मद्य विक्री व मद्य सेवन करणा-यावर कारवाई करुन रु, २५०००/- ते ३००००/- हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा मा, न्यायालयाकडुन ठोठावण्यात आली आहे. तसेच निवडणुक कालावधीत अशा प्रकारच्या हॉटेल्स, ढाब्यांवर अवैधरीत्या मद्य विक्रि व मद्य पिण्यास परवानगी देणा-या ढाब्यांवर व हॉटेल्सवर कारवाई करण्याकरीता विषेश पथके नेमण्यात आली आहेत. सदर कारवाई प्र. उपअधीक्षक जे.एन.पाटील, निरीक्षक श्री.आर.एम.चवरे, श्री. ओ व्ही घाटगे, श्री डी आर बामणे तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी.कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर.एम. कोलते, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, दिलीप सानप, अभिजित साळुंखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री. संजय चव्हाण, जवान सर्वश्री चेतन व्हनगुटी, आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, प्रशांत इंगोले,अनिल पांढरे, विनायक काळे, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले,रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली. अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ द्वारे या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button