
सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी रंगेहात जाळ्यात. सोलापूर: सांगोला येथील तहसील कार्यालयांतर्गत संगेवाडी मंडळाच्या महिला मंडळ अधिकारी आणि त्यांच्या खासगी चालकाने तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी ७,००० रुपयांची लाच मागितली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (५ मार्च २०२६) सापळा रचून या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
विजया महारुद्र नाईक (वय ४५ वर्षे) – पद: मंडळ अधिकारी, संगेवाडी मंडळ, तहसील कार्यालय सांगोला.व वैभव पिराजी मोरे (वय २८ वर्षे) – खासगी वाहन चालक (खासगी व्यक्ती). यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या आईने खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तऐवजावर आलेल्या हरकतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून, ती नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आरोपी श्रीमती विजया नाईक यांनी चालकामार्फत तडजोडीअंती ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, लाच स्वीकारताना अधिकारी जाळ्यात मंडळ अधिकारी नाईक यांनी लाचेच्या मागणीला दुजोरा दिला आणि खासगी चालक वैभव मोरे याला पैसे स्वीकारण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून वैभव मोरे याला ७,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यत आले..
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी सोलापूरच्या पथकाने केली आहे.
सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे मो.क ९८२३१६७१५४. श्री. अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुर्ण मो.क ९०२९०३०५३०, याचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर, रविंद्र लांमाते, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, प्रियंका गायकवाड, अक्षय श्रीराम राई नेमणुक एसीबी सोलापूर यांनी केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किया त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देणेसाठी कायदेशीर की व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास जयाबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास संपर्क साधध्याचे आवाहन श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर, मो.क. ९८२३२२५४६५ यांनी केले आहे.



