Nation
Trending

कंदलगावच्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर  ग्रामीण पोलिसांची मोठी धडक कारवाई  ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त करत ७० जणांवर गुन्हा दाखल

५६  लाखाचा मुद्देमाल जप्त करत  ७०  जणांवर गुन्हा दाखल 

कंदलगाव, दि २ (प्रतिनिधी राहुल उडणशिव ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये ५६ लाख एक हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये एकूण ७०  जणांवर मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर गावच्या शिवारामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बार मध्ये काही महिला तोकडे कपडे घालून बीभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून डीजेवर नाचत असल्याची  माहिती मिळाली त्यावरून अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष पथकास सदर कार्यवाहीची सूचना दिली. त्या अनुषंगाने विशेष पथकाने मंद्रूप  पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथे कारवाई करीता गेले असता तेथे मिळालेल्या बातमीप्रमाणे १२  महिला तोकडे कपडे घालून बीभत्सपणे अश्लील नृत्य व हावभाव करून डीजेच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याचे तसेच तेथील ग्राहक त्या नाचणाऱ्या नृत्यांगनावर नोटा सद्रस्य  कुपन उधळताना  मिळून आले. 

सदर कार्यावाहीत करताना  ५५  ग्राहक तसेच पुष्पक ऑर्केस्ट्रा बारचे  मालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर बाळे सोलापूर व मालक रोहित पांडुरंग चव्हाण राहणार सोलापूर यांच्यासह एकूण  ७० लोकांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र हॉटेल उपग्रहे , मध्यपान कक्ष बार रूम यामधील नृत्य व असल्यानंतर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणारी महिलेच्या प्रतिष्ठेची संरक्षण करणे बाबत अधिनियम २०१६ चे कलम ३,८(१),(२) (४)  तसेच भारतीय न्याय संहिता २५६ , ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  यावेळी पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथून ५६ लाख एक हजार ९८०  किमतीचे डीजे साहित्य , ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य तसेच वाहने, मोबाईल जप्त करण्यात आले. 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अंतराम , पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संन्नगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोरे, हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री हुळ्ळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, मंद्रूप पोलीस ठाणे व स्टाफ यांनी कारवाई केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button