Nation
Trending

तुळजापूरमधील अवैध धंद्यांविरोधात नगराध्यक्षांनी उठवला आवाज

लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन

तुळजापूर , दिनांक २१ मार्च (प्रतिनिधी सुरज थोरात ): शहरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने तुळजापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.तुळजापूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी यांच्या पवित्र नगरी म्हणून ओळखले जाते. दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र शहरात काही ठिकाणी जुगार, मटका, अवैध दारू विक्री यांसारखे धंदे सुरू असल्याने शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.या निवेदनात संबंधित अवैध धंदे तात्काळ बंद करून त्यामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या आठवड्यात पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनावर खालील नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शविला आहे :विनोद पि. गंगणे, औदुंबर कदम, नरेश अमृतराव किशोर साठे, माऊली भोसले, सागर कदम , रत्नदीप भोसले, लखन पेंदे,दिनेश क्षीरसागर,पडितरावं जगदाळे,अजित परमेश्वर,आनंद सावंत,विजय कांबळे,विशाल रोचकारी आदींसह इतर नागरिक उपस्थित होते.सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयासही देण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button