
तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 10 मधून आनंद जगताप उतरणार निवडणुकीच्या रिंगणात —
प्रभागात आनंदाचे वातावरण , कार्यकर्ते लागले कामाला
तुळजापूर दि. 18,( प्रतिनिधी सूरज थोरात ) – यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे , त्यात आणखी भर म्हणजे एक विषय चांगलाच चर्चेत असून, प्रभाग क्रमांक 10 मधून सामाजिक कार्यात कायम भाग घेणारे समाजसेवक आनंद जगताप यांची जोरदार एंट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आनंद जगताप हे तुळजापूर शहरातील मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवले आहेत. नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा विकासाभिमुख, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेत्याची असल्याने याचा नक्कीच जनतेला फायदा होणार असल्याचा सुर परिसरातून ऐकू येत आहे .
यंदाच्या दिवाळी सणानिमित्त आनंद जगताप यांनी प्रभाग क्र. 10 मधील नागरिकांना शुभेच्छा देत भाऊबीजच्या निमित्ताने विशेष भेटवस्तूंचे वितरण केले. यावेळी महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले .
“तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभाग क्र. 10 मधील प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी मी नेहमीच तत्पर राहीन. सणासुदीच्या काळात आनंद वाटणे हे माझे कर्तव्य आहे.” असे आनंद जगताप म्हणाले
स्थानिक नागरिक, व्यावसायिक वर्ग आणि तरुणांमध्ये आनंद जगताप यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तुळजापूरच्या नगरपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे ही नक्की.



