
अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर घटकाकडून श्री. सलीम हशरफ शेख, (खाजगी इसम) यांचेवर लाच मागणी व लाच
स्वीकारले प्रकरणी कारवाई केलेबाबत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक
पोलीस स्टेशन व गुन्हा नोंद क्रमांक
कलम
आरोपीचे नांव व कार्यालय
मागणी केलेली लाचेची रक्कम
स्विकारलेली लाचेची रक्कम
पडताळणी दिनांक
सापळा दिनांक
ठिकाण
सापळा अधिकारी यांचे नाव व पद
सोलापूर घटक
सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनिय सन १९८८ चे कलमान्वये.
श्री. सलीम हशरफ शेख, (खाजगी इसम), रा. घर नंबर २३०, उत्तर सदर बझार,
लष्कर सोलापूर, जि.सोलापूर.
२५,०००/- रुपये.
मागणी केलेल्या २५,०००/- रुपये लाच रक्कमे पैकी पहीला हप्ता ५०००/- रुपये.
दि. १३/१०/२०२५
दि. १५/१०/२०२५ भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालय सोलापूर जवळील आस्था हॉस्पीटलच्या बाजुला,
सिध्दर्थ हौसिंग सोसायटी सोलापूर
श्री.प्रशांत चौगुले,पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर (मो.नं. ९८२३२२५४६५),
तपास अधिकारी यांचे नाव व पद श्री. शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर (मो.नं.९६५७९१७३१७) थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार यांचे भाऊ हे विठ्ठल रुक्मीणी मंदीर समिती पंढरपूर येथे सन २०१४ ते २०२३ या
कालावधीत शासनाने नेमलेप्रमाणे पुजारी म्हणून काम करत होते. त्यानंतर ते सन २०२३ मध्ये मयत झाले.तक्रारदार यांचे भाऊ
मयत झालेनंतर मयत यांच्या पत्नीने त्यांचे पतीचा पीएफ फरक, मृत्यु विमा व पेन्शनचे बील काढणेकरीता मा. आयुक्त, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, कार्यालय सोलापूर येथे अर्ज दिला होता. त्याचा पाठपुरावा यातील तक्रारदार हे करत होते.
तक्रारदार हे पाठपुरावा करत असताना तक्रारदार यांचे मयत भावाचे पीएफ फरक,मृत्यु विमा व पेन्शनचे बील मधील पहिला
हप्ता ३८,०००/- रुपये खात्यावर जमा केले असून, उर्वरीत बील काढण्याकरीता श्री. सलीम हशरफ शेख, (खाजगी इसम) हे
स्वतः साठी व साहेबांन करीता २५,०००/- रुपये लाच रक्कम मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि.
१३/१०/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे दिली होती.
यातील तक्रारदारने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ला.प्र.वि., सोलापूर पथकाने दि. १३/१०/२०२५ रोजी लाच मागणी
पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आरोपी श्री.सलीम हशरफ शेख, (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांचेकडे
त्यांचे मयत भावाचे उर्वरीत पीएफ फरक, मृत्यु विमा व पेन्शनचे बील काढण्याकरीता स्वतःसाठी व साहेबांन करीता म्हणून
तत्कारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, त्यापैकी पहिला हप्ता ५०००/- रुपये लाच रक्कम आज रोजी घेवून
येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले.
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दि. १५/१०/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई
दरम्यान यातील आरोपी श्री. सलीम शेख, (खाजगी इसम) यांनी भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालय सोलापूर जवळील
आस्था हॉस्पीटलच्या बाजुला, सिध्दर्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे तक्रारदार यांचेकडून ५०००/- रुपये लाच स्वीकारली
असता रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुध्द सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची
प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक, श्री.शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि., पुणे परिक्षेत्र, पुणे व
अपर पोलीस अधीक्षक, श्री.अजीत पाटील, ला.प्र.वि., पुणे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अर्जुन भोसले, ला.प्र.वि., पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री.प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, श्री.रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक, पोह शिरिषकुमार
सोनवणे, श्रीराम घुगे, पोकों राजू पवार, अक्षय श्रीराम सर्व नेम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी केली. लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करुन
देण्यासाठी कायदेशीर की व्यतिरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास खालील क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर (मो.नं. ९८२३२२५४६५) यांनी केले आहे.
१) अॅन्टी करप्शन व्युरो, सोलापूर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८,
२) व्हॉट्स अॅप क्रमांक – ९४०४००१०६४ (सोलापूर),
३) ई मेलआयडी सोलापूर yspacbsolapur@gmail.com
४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
५) ऑनलाईन तक्रार अॅप www.acbmaharashtra.net.in




