Nation
Trending

घाडगे कुटुंबाच्या सामाजिक कार्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल

आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांची राजन घाडगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मोहोळ दि. [ प्रतिनिधी ] : समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या घाडगे कुटुंबाच्या कार्याची दखल घेत अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी राजन घाडगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राजन घाडगे व सौ. प्रिती घाडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी घाडगे कुटुंबीयांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि भगवद्गीता देऊन अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार केला.
यावेळी बोलताना आनंदराव अडसूळ यांनी घाडगे यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. “समाजाच्या सर्वांगीण साठी तुम्ही ज्या निष्ठेने कार्य करत आहात, ते आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अशा कार्यकर्त्यांची पाठराखण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे अडसूळ म्हणाले.
घाडगे यांचे समाजातील दुर्बल, उपेक्षित व मागासवर्गीय घटकांसाठी चाललेले कार्य हे केवळ सेवाभावातून नव्हे, तर एक सामाजिक चळवळ म्हणून उदयास येत आहे. त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर उभारलेल्या लढ्यांमुळे जनजागृती आणि सशक्तिकरणाची प्रक्रिया गतीमान झाली आहे.
ही भेट केवळ औपचारिक नसून, एका सामाजिक मूल्यांची जाणीव असलेल्या नेतृत्वाची आणि जनतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या एकतेची साक्ष होती.
आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आहोरात्र समाजासाठी केलेल्या कार्याला आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढलेल्या लढ्याला शब्दात सन्मानित करणे हे फार कठीण आहे. अडसूळ यांचे व्यक्तिमत्व हे समतेचा संदेश देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे आहे. केवळ एक प्रशासकीय पदावर कार्यरत नसून, समाजाचं एक प्रेरणास्थान आहात. भगवद्गीतेची प्रत देऊन सत्कार करत आहोत, कारण भगवद्गीतेप्रमाणेच तुमचं जीवनसुद्धा सत्य, कर्तव्य आणि निष्ठेचा मार्ग दाखवणारं आहे. तुमचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला नेहमीच प्रेरणादायी राहील असे राजन घाडगे यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी सहकार विभागाचे राज्य अध्यक्ष आनंद यादव, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, फुलचंद सरवदे, लक्ष्मण काळे, कृष्णात शिंगाडे, मारुती कांबळे. दिनेश माने, माजी सरपंच बिलालभाई शेख, राम कांबळे, न्यूज रिपोर्टर अशोक कांबळे, महादेव खवळे, अनिल घाडगे, छाया घाडगे, रुपेश घाडगे, राजवर्धनी घाडगे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button